परिचय

मूलभूत मूल्ये

सोनोरी येथील श्री दत्तप्रभू देवस्थान ऐतिहासिक स्थळ आहे. तसेच संस्थानाच्या परिसरामध्ये इतिहासकालीन विहीर सुप्रसिद्ध आहे.तसेच महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे गावांमध्ये असलेले पाचवड संस्थान येथे काही काळ वास्तव असल्यामुळे पाचवड संस्थानाला ऐतिहासिक ओळख आहे. तसेच वीर भगतसिंग व्यायाम प्रसारक मंडळ हे इतिहासकालीन असलेलं सर्वात जुने मंडळ असून या मंडळाने गावाचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केलेला आहे. गावात असलेल्या विविध इतिहासकालीन मंदिरांमुळे गावाला संस्कृतीक ओळख निर्माण झाली आहे.

भौगोलिक स्थान

विदर्भातील गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेले चांदूरबाजार या तालुक्याच्या ठिकाणापासून सोनोरी हे गाव 8 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाच्या विकासामध्ये भौगोलिक परिस्थितीचा सिंहाचा वाटा असून गावातील 80 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्याचे प्रमुख पीक संत्रा,तूर,कपाशी,सोयाबीन असले तरी संत्रा पिकामुळे गावाला नवीन ओळख निर्माण झाली आहे.

सांस्कृतिक ओळख

पारदर्शकता : ग्रामपंचायतीच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणून "डिजिटल ग्रामपंचायत" सारख्या उपक्रमातून लोकाभिमुख करणे.

लोकसहभाग : ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णय आणि प्रक्रियेमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग घेणे ज्यामध्ये लोकांचे विचार, गरजा आणि मूल्ये इ. अधीन राहून गावाचा विकास करणे.

जबाबदारी : ग्रामपंचायतीच्या निर्णय,कृती,कार्य इ. ची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून गावाचा विकासला गती देणे.

समानता : नागरिकांना समान संधी न्यायिक अधिकार देणे तसेच वंश, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांच्यात कोणताही भेदभाव न करणे.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन : नैसर्गिक संसाधने यांचा योग्य उपयोग व पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवून स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करून पर्यावरणाचे जतन करणे.

प्रामाणिकपणा : प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा, नीतीमत्ता आणि सार्वजनिक कार्यात हिताची भावना जपणे.

नवीन उपक्रम व नावीन्य : आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता आणि इतर सामाजिक-आर्थिक बाबींचा विचार करून उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून गावाचा विकासाला गती मान करणे.

सेवाभाव : नागरिकांच्या प्रती प्रेम, सहानुभूती, सहवेदना आणि एकात्मतेची भावना ठेवून निःस्वार्थपणे कार्य करून लोकाभिमुख सेवा पुरवणे.

ग्रामपंचायतीचा इतिहास

सोनोरी ग्रामपंचायतची स्थापना 1962 या वर्षी झालेली आहे. ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असणारे गावे गणोजा आणि सुलतानपूर ही आहे. सोनोरी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच श्री. शंकरराव भेले तर पहिल्या महिला सरपंच नीताताई न.मडके हे होऊन गेले आहे.
ग्रामपंचायतचे घोषवाक्य "आमचे गाव आमचा विकास" हे असून ग्रामपंचायत गावांमध्ये मूलभूत गरजाची पुरतता करण्यात सदैव प्रयत्नशील आहे. तसेच हागणदारी मुक्त गाव, तंटामुक्त गाव,डिजिटल ग्रामपंचायत,अशा विविध प्रकारच्या योजना/उपक्रम कार्यक्रम राबवून गावाचा विकासा साधण्याचा ग्रामपंचायतीने सदैव प्रयत्न केलेला आहे. सोनोरी ग्रामपंचायत ही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गावाचा विकासाच्या चळवळीमध्ये सदैव कार्यरत असून गावाचा सर्वांगीण विकास करणे हे ग्रामपंचायतचे मुख्य उद्दिष्ट आहे.विकासात्मक कार्य करून ग्रामपंचायतीचे नाव विकासाच्या सोनेरी पटावर नोंदवण्यात कार्यशीलआहे.

दृष्टीकोन

एकात्मिक आणि सर्वसमावेशक गावाचा विकास करणे ज्यामध्ये उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत पायाभूत सुविधा पर्यावरणाचे संवर्धन, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना नवीन संधी उपलब्ध, आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची समान संधी मिळेल. यामध्ये गावातील वंचित घटकांना प्राधान्य देऊन त्यांना मदत करून “स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि आत्मनिर्भर" ग्राम निर्माण करणे.

ध्येय

ग्रामातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण इ. मूलभूत सोयी पुरवणे. तसेच शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. ग्रामातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि हरितग्राम असे उपक्रम राबवून ग्रामांचा विकास करणे. ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल पद्धतीने सक्षम करून लोकभिमुख करणे.
कार्यालयीन पत्ता :-

ग्रामपंचायत कार्यालय,सोनोरी तालुका - चांदूर बाजार
जिल्हा - अमरावती
मो. नं - 9890603566
मो. नं - 8766 518920
ई-मेल - gpsonori111@gmail.com


महत्वाचे
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Cancellation and Refund
  • Shipping and Delivery Policy